

Mumbai ATS Probe
esakal
संजय गडदे
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात उघडकीस आला आहे. चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला मलंगगड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई एटीएसनेही (ATS) स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.