covishield esakal
अकोला

अकोला : वर्धा जिल्ह्यातून बोलावले कोव्हिशिल्डचे ४० हजार डोस

शासनाकडून डोसचा पुरवठाच नाही

सकाळ वृत्तसेवा

अकोला - जिल्ह्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच कोव्हिशील्ड लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग जवळच्या जिल्ह्यातून लसींचे डोस घेत आहे. त्यानुसार बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यांकडून लसींचे डोस घेतल्यानंतर आता आरोग्य विभागाने मंगळवारी वर्धा जिल्ह्यातून कोव्हिशील्ड लसींचे ४० हजार डोस घेतले. संबंधित लसींच्या डोसचे प्रत्येक तालुक्यांला वाटप सुद्धा करण्यात आले. त्यामुळे बुधवारपासून लसीकरणाची गती वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार अकोला शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बूस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसपासून सुरक्षेच्या दृष्टीने पात्र सर्व व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावे यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे.

कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेवून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. परिणामी जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. असे असतानाच सर्वाधिक कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचा तुटवडा जाणवत आहे.

इतर जिल्ह्यांवरच मदार

जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचा तुटवडा जाणवत असल्याने यापूर्वी आरोग्य विभागाने २० जुलै रोजी हिंगोली येथून कोव्हिशील्डचे ७ हजार ८०० तर १९ जुलै रोजी बुलढाणा येथून ३ हजार डोस घेतले. त्यामुळे इतर जिल्ह्यातील लसींवरच जिल्ह्यातील लसीकरण मोहीम सुरु असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हिंगोली व बुलढाणा जिल्ह्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातून लस मागवण्यात आल्या आहेत. वर्धा येथून जिल्ह्यासाठी ४० हजार लसींचे डोस मिळाले आहेत.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT