Covishield vaccine SAKAL
अकोला

अकोला : कोव्हिशिल्ड मुबलक; कोव्हॅक्सिनचा साठा अल्प

सात दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी त्याचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाला आरोग्य विभाग प्राथमिकता देत आहे. परंतु वर्षपूर्तीनंतर सुद्धा जिल्हा लसीकरणाच्या उद्‍दिष्टपूर्तीपासून अद्याप दूर आहे. असे असतानाच जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लसीचा साठा मुबलक तर कोव्हॅक्सिनचा साठा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोव्हॅक्सिन घेणाऱ्याना केवळ सात दिवसच लस घेता येईल, अशी स्थिती आहे.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली.

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली. दरम्यान आता १५ वर्षावरील युवकांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, दूसरीकडे कोव्हॅक्सिनचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरणावर सुद्धा त्याचा अधून-मधून प्रभाव होत आहे.

अशी आहे लस घेणाऱ्यांची स्थिती

  •  एकूण - १९ लाख ५० हजार ९८७

  •  पहिला डोस - ११ लाख ८७ हजार ३३२

  •  प्रिकॉशन डोस - १३ हजार २१६

अशी आहे शिल्लक लस

  •  कोव्हॅक्सिन - ६ हजार

  •  कोव्हिशिल्ड - ९५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT