crime in akola  esakal
अकोला

तीन मुलांच्या हत्येच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या बापाची आत्महत्या

स्वतःच्या तीन मुलांच्या खुनाच्या आरोपातून न्यायालयाने २९ जून रोजी निर्दोष सोडलेल्या बापाने दुसऱ्याच दिवशी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्वतःच्या तीन मुलांच्या खुनाच्या आरोपातून न्यायालयाने २९ जून रोजी निर्दोष सोडलेल्या बापाने दुसऱ्याच दिवशी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोतर्डी येथे शुक्रवारी (ता. १) घडली.अकोला जिल्ह्यातील धोतर्डी गावात १० मे २०१८ रोजी विष पाजून पोटच्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप वडिलांवर होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपी वडिलाची निर्दोष सुटका केली. मात्र, कारागृहातून सुटताच वडिलाने आत्महत्येच धक्कादायक पाऊल उचलले. विष्णू दशरथ इंगळे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

धोतर्डी गावात घडले होते तिहेरी हत्याकांड

बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धोतर्डी हे गाव १० मे २०१८ रोजी तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. विष्णू दशरथ इंगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्यांनी स्वतःचे तीन मुलं १७ वर्षीय अजय इंगळे, १५ वर्षीय मनोज इंगळे आणि १२ वर्षांची मुलगी शिवानी यांना विष पाजले होते. वरून वरवंट्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली असल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आरोपी निकाल लागेपर्यंत कारागृहात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT