

Aaditya Thackeray Disha Salian case
esakal
Aaditya Thackeray defamation notice : सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण मिळाले आहे. या दाव्याची नोटीस देण्यासाठी सतीश सालियान शनिवारी दुपारी चार वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत. दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावर पुराव्यांशिवाय वक्तव्य करू नका, अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.