Crime News Balapur Revenue Department action on Sand Mafia 65 lakh stock seized sakal
अकोला

Crime News : वाळू माफियावर कारवाई; ६५ लाखांचा साठा जप्त

बाळापूर महसूल विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : तालुक्यात मन नदीच्या पात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असून नदीकाठच्या गावा शेजारी वाळू साठवून ठेवण्यात आलेल्या बेकायदा वाळूच्या साठ्यावर बाळापूर तहसील विभागाच्या पथकाने छापा टाकला.

त्यात वेगवेगळ्या सात साठ्यात १ हजार८७.७१ ब्रास वाळू तहसीलच्या पथकाच्या हाती लागली आहे. गुरुवारी २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दिवसभर अवैध वाळू साठा जप्तीची कारवाई सुरू होती.

बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीती सात गावांच्या शिवारातून तब्बल ६५ लाख २२ हजार रुपये किंमतीचा १ हजार ८७ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील निंबा, अंदुरा, लोहारा, हाता, स्वरुपखेड या भागात काळ्या सोन्याचे कोठार असलेल्या मन नदीतून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी वाळू तस्करी रोकण्यासाठी मोहीम उघडली आहे. मागील महिन्यांपासून वाळू तस्करांना डॉ. रामेश्वर पुरी यांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे, तर गौण खनिज जप्त करून मोठा दंड ठोठावला आहे. तरीही काही राजकीय पक्षाचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू होती.

दरम्यान नदीकाठी असलेल्या गावा शेजारी अवैध वाळू साठा केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार सय्यद ऐसानोद्दीन व त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अनधिकृत वाळू साठा जप्त केला.

या ठिकाणाहून वाळू साठा जप्त

काही महिन्यांपासून अवैध वाळू उपसा खुलेआम सुरू होता. गौणखनिज विभागाने वाळू लिलाव केलेला नसताना अनेक ठिकाणी वाळू उपसा आणि वाहतूक सुरू होती. याच पद्धतीत तालुक्यातील काजीखेड येथे १३५.५ , स्वरुपखेड येथून ४३.२७, मोखा येथून ६७.६०, नागद येथून ३८०.३५, निंबी येथून १७२.२२, बहादुरा येथून ३०४.७४ , तर हाता येथून १४. ४ असा १ हजार ८७.७१ ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

War Ceasefire Impact: युद्ध थांबलं, आता महागाईवर ब्रेक लागणार? मजबूत रुपयामुळे तुमच्या खिशाला कसा फायदा!

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरीसाठी ७ टक्के कमिशनची मागणी, लाच घेताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक

डोक्यावर टक्कल,भेदक डोळे ! वाढदिवसाला सुपरस्टार अल्लू अर्जुनची चाहत्यांना खास भेट; ॲटली सोबतच्या बिग बजेट सिनेमाचा पहिला लूक रिलीज

SCROLL FOR NEXT