अकोला

Crime News: दरोडा टाकण्यापूर्वीच दरोडेखोर जेरबंद!

बाळापूर पोलीसांची कारवाई; सात दरोडेखोरांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Balapur: बाळापूर ते पातूर मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात अट्टल दरोडेखोरांना बाळापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.

या दरोडेखोरांच्या ताब्यातून एका वाहनासह एक देशी बनावटीची पिस्टल, ७ जिवंत राउंड, वेगवेगळ्या कंपणीचे मोबाईल,नगदी रक्कम, दरोड्याचे साहित्य व मिर्ची पुड असा ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाडेगाव ते पातूर मार्गावर गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी हे कर्तव्यावर असताना आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खामगाव येथून एमएच ३७ एडी ३४९० ही इर्टीगा कार बाळापूरच्या दिशेने निघाली असून त्यामध्ये सात जण बसलेले आहेत, व त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गोकुळ राज जी यांना खबऱ्याने दिली.

माहिती मिळताच बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे, सहा पोलिस निरीक्षक पंकज कांबळे, समाधान रिठे, विनोद घुईकर, सहा पोलिस उपनिरीक्षक विनायक पवार, सिरसाठ, शिवकुमार वर्मा, संजय वानखडे, पोलीस कर्मचारी सैय्यद शारीक, संतोष सोळंके, संतोष करंगळे, अंकुश मोरे, रफीक शेख, विजय गिऱ्हे, नाईक पोलिस हवालदार संजीव कोल्हटकर, गणेश गावंडे, सतिष वाडेकर, पोकॉ. अक्षय देशमुख, प्रविण अवचार, मोहन ढाकरे, विठ्ठल उकर्डे, गजानन शिंदे, मनिष ठाकरे यांनी बाळापूर पातूर मार्ग गाठला.

नाकाबंदी दरम्यान अडकले दरोडेखोर

पोलीसांनी तातडीने वाडेगाव ते पातूर मार्गावर नाकाबंदी केली. यादरम्यान बाळापूर कडून पातूरच्या दिशेने जाणारे वाहन पोलिसांच्या दृष्टीस पडले. पोलिसांनी वाहन अडवले. यावेळी वाहनात सात जण बसले होते.

कारमध्ये पोलिसांना एक देशी बनावटीची पिस्टल व ०७ जिवंत राउंड (कि.अं. २५ हजार रूपये), तसेच वेगवेगळ्या कंपणीचे मोबाईल (किं.अं.६० हजार रूपये), एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार (किंमत ७ लाख रुपये), लाल तिखट पावडर, दोरी, टॉर्च, चाकू असे दरोडा टाकण्याच्या साहीत्यासह सात लाख ८५ हजार रुपयांचा आढळून आला.

सात दरोडेखोरांना अटक

राहुल भगवान खिल्लारे (वय २६ वर्ष), रा. शाहूनगर हिंगोली, ऋतिक कल्यानराव वाढवे (वय २१ वर्ष), रा. पिंपळखेड जि. हिंगोली, सुर्यकिरण बळीराम चोरमल (वय २३ वर्ष), रा. इसापूर रमना, ता. जि. हिंगोली, अंकुश रमेश कंकाळ (वय २२ वर्ष), रा.सावरगाव (बर्डी) ता. जि. वाशिम, नितेश मधुकर राऊत (वय ३५ वर्ष) रा. जांभरूण जहाँगीर ता.जि. वाशिम, सुमित शेषराव पुंडगे वय २२ वर्ष रा. पिंपळखेड जि. हिंगोली, देवानंद अमृता इंगोले (वय २६ वर्ष), रा. सावळी ता.जि. वाशिम यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT