crime update Ajit Hirve fraud case employment to women Police did not succeed in finding him akola
crime update Ajit Hirve fraud case employment to women Police did not succeed in finding him akola sakal
अकोला

फसवणुकीतील आरोपींचा शोध लागेना!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अजित हिरवे आणि शेकडो बेरोजगार युवकांकडून रोजगाराच्या नावाखाली पैसा गोळा करणारे चंद्रपूर येथील भामट्यांचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, अद्यापही त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. या ठकबाजांचा शोध घेवून पोलिस न्याय देतील, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्यांना आहे. पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कार्पाेरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीचा संचालक आणि सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवे याने महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये लाटले.

यामध्ये अकोल्यातील एजंट संगीता चव्हाणने जिल्ह्यात १२०० महिलांची साखळी तयार करून त्यांच्याकडून पैसे गोळा केले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने केल्या तपासणानुसार तिघांविरुद्धही खदान पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले व सूत्रधार आरोपी संगीता चव्हाणला अटक केली.तपासात चव्हाणच्या संपत्तीची माहिती गोळा करण्यात आली आहे. मात्र, तिची तुटपुंजी मालमत्ता हजारो महिलांचे लाटले पैसे परत मिळवून देण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे जोपर्यंत मुख्य सूत्रधार हिरवे पोलिसांच्या जाळ्यात सापडत नाही तोपर्यंत फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळणे अश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी हिरवेला ताब्यात घेण्याकरिता तातडीने पावले उचण्याची अपेक्षा फसवणूक झालेल्या महिलांनी व्यक्त केली. हे प्रकरण ताजे असतानाच रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेरोजगार युवक-युवतींची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. फिर्यादी शुभम विष्णू झाडोकार यांच्या तक्रारीवरून अंकित किशोरलाल यादव, रुपेश खापेकर (रा. चंद्रपूर) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणात पैसे गोळा करणारी भाग्यश्री सुहास कुलकर्णी हिच्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. तिने युवकांकडून प्रत्येकी एक ते पाच हजार रुपये गोळा केल्याचा दावा जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला होता. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही.

मुंडगावकर ज्वेलर्स फसवणुकीतही न्यायाची प्रतीक्षा

शहरातील गुंतवणुकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या मुंडगावकर ज्वेलर्स संचालकांची जमीन, सोने-चांदी आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. गुंतवणुकदारांना त्यांची रक्कम परत देता यावी म्हणून जप्त मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात ६०० पानाची चार्जशीट दाखल केली आहे. लिलावाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे या फसवणूक प्रकरणात तक्रार करणाऱ्या ४५२ जणांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT