अकोला

दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले

सकाळ वृत्तसेवा

वाशीम ः आधीच बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला असताना, आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. अनियमित पावसाने पेरलेले सोयाबीन कुजले असून, कृषी विभागाने याबाबत सर्वे करून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यामधे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता.
मानोरा व मालेगाव तालुक्यात मुसळधार, तर इतर तालुक्यात साधारण पाऊस बरसला होता. रिसोड तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. (Crisis of double sowing on farmers in Washim)

वाशीम, मालेगाव, कारंजा या तालुक्यात अपूऱ्या पावसावर पेरणी झाली. परिणामी पेरणीनंतर पाच ते सहा दिवस पाऊस न आल्याने या पेरण्या उलटल्या आहेत. मालेगाव व मानोरा तालुक्यात सुरवातीलाच मुसळधार पाऊस पडला, मात्र पेरणी केल्यानंतरही जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे बियाणे दबले जावून उगवण झाली नाही. शिरपूर जैन परिसरातील अनेक गावात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पहिल्या पेरणीसाठी कर्ज काढून बेगमी केली असताना, दुबार पेरणीची सोय कशी करावी? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीबाबत पंचनामे करून किमान बियाण्याची मदत होईल, असे धोरण राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.


बीज प्रक्रीयेअभावी झाले नुकसान
सोयाबीन हे द्विदल तेलवाण आहे. सोयाबीनचे कवच अतिशय पातळ असते. अपूऱ्या ओलीत किंवा पाणी साचले, तर या कवचाला बुरशी धरते. या बुरशीमुळे सोयाबीनचा अंकूर सडतो परिणामी उगवण होत नाही. यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी घरची सोयाबीन बियाणे पेरले, मात्र बीज प्रक्रीया न केल्याने हे सोयाबीन पातळ उगवले आहे.


अपुऱ्या ओलीवर पेरणी झाली तर बियाणे उगवत नाही. आता दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. जमिनीत वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी, तसेच बीज प्रक्रीया आवश्यक असून, चांगले उगवण क्षमता असलेले बियाणे निवडावे. पेरणी करताना आधीच्या पेरणीचे खत सात ते आठ सेंटीमीटरवर दिले असेल, तर पुन्हा खते देण्याची गरज नाही. शक्यतो आधी पेरलेल्या तासाच्या बाजुला पेरणी करावी. पेरणीची वेळ अजूनही गेली नाही.
- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी.

संपादन - विवेक मेतकर

Crisis of double sowing on farmers in Washim

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT