akola news sakal
अकोला

Akola News : पूर्ण होण्यापूर्वीच सांस्कृतिक भवनाला तडे; मनसेची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

काचा फुटल्या; बांधकामही अर्धवट; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष

मनोज भिवगडे

अकोला : शहराला सांस्कृतिक ओळख असली तरी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक अशी कुठेही जागा नाही. महत प्रयत्नांनी अकोला शहरातील क्रीडा संकुल भागात सांस्कृतिक भवनाच इमारत उभी राहत असतानाच त्यात राजकारण आडावे आले आणि भवनाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे गेले.

काचा फुटल्या, बांधकामही अर्धवट राहिले. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तर सोडाच पण स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नटश्रेष्ठ राम जाधव यांनी बघितलेल्या स्वप्नांनाही ‘तडे’ जाताना दिसत आहे.

अकोला शहराच्या वैभवात भर टाकणारी वास्तू म्हणून सांस्कृतिक भवनाकडे बघितले जात होते. डोलदार इमारत आणि त्यातील आधुनिक सुविधा येथील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारी होती.

मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची वृत्ती या सांस्कृतिक भवनाच्या निर्माण कार्यापासूनच त्याच्या उद्देशाला तडे देताना आढळून येत आहे. त्यामुळेच क्रीडा संकुलावर अर्धवट अवस्थेत उभी असलेली ही इमारत पूर्ण होण्यापूर्वीच ‘राजाश्रया’च्या कुबड्या शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

सांस्कृतिक क्षेत्रातूनही पुढाकार नाही

नटश्रेष्ठ राम जाधव यांनी अकोल्यात सुसज्य सांस्कृतिक भवन असावे असे स्वप्न बघितले होते. त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, त्यांच्या जाण्यानंतर तर सांस्कृतिक क्षेत्रातूनही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

मनसेची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

विद्यमान उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असताना अकोल्यात सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचा पाया रचला गेला होता. त्यानंतर इमारतीचे बांधकाम सुद्धा सुरू झाले. मात्र पूर्णत्वास जाण्यापूर्वीच काम ठप्प पडले आणि जवळपास पाच करोडचा निधी शासनाकडे वापस गेला.

सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्यमान उपमुख्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत या भवनाची रंगरंगोटी,

साहित्य व इंटिरियर बद्दल नवीन सुधारित अंदाजपत्रक काढून त्यावरील निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष सौरभ भगत यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, तू काय सांगतोस; मी २ वर्ष संघाबाहेर होतो! Ishan Kishan पत्रकारांसमोर असं का म्हणाला? अभिषेक शर्मासोबतचा Video Viral

Ambethan News : पिंपरी खुर्द येथील आगीत चार घरे जळून खाक; आदिवासी ठाकर बांधवावर दुःखाचा डोंगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षकांचा मनमानी कारभार; अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नोकरीला रामराम, नागरिकांचाही तीव्र संताप

Konkan Mango Crisis : कोकणचा कणा असलेला आंबा संकटात; ९० टक्के मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल

T20 World Cup नंतर टीम इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार का? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT