lockdown file photo
अकोला

शटर डाउन, व्यवहार सुरू!

पहिल्याच दिवशी झुगारली संचारबंदी; गर्दी ओसरली

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राज्यासह जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या संचारबंदीला बुधवारी रात्रीपासून सुरुवात झाली. पहिल्यात दिवशी अकोला जिल्हा व शहरात नागरिकांनी संचारबंदी झुगारल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळाले. मोठी प्रतिष्ठाने बंद असली तरी शहराच्या बहुतांश भागात जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांसोबतच इतरही प्रतिष्ठानांमध्ये शटर अर्धे उघडून तर कुठे शटर बंद करून व्यवहार सुरू असल्याचे बघावयास मिळाले. संचारबंदीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येण्याचे टाळल्याने शहरातील गर्दी बऱ्याच प्रमाणात ओसरल्याचे गुरुवारी बघावयास मिळाले.


कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पंधरा दिवसासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. त्यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली. अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना सूचनाही देण्यात आल्यात. बुधवार, ता. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून संचारबंदीला सुरुवात झाली. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

असे असतानाही शहरातील बहुतांश भागातील व्यवहार गुरुवारी सकाळपासूनच सुरू होते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात रस्त्यांवर गर्दीही बघावयास मिळाली. काही भागात तर थेट दुकाने उघडून व्यवसाय सुरू होता. काही प्रतिष्ठाने अर्धे शटर उघडून व्यवहार करताना आढळून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील गर्दी दिवसभर कायम होती. नागरिकांचे आवागमणही सुरूच होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत शहरात संचारबंदी आहे तरी कुठे, असा प्रश्न पडला होता.
...................


एसटी बसची चाके रुतली
संचारबंदीच्या काळात अनेक मार्गावरील प्रवाशी संख्या रोडावली. त्यामुळे अकोला बस स्थानकावरून सुटणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द करून बस चालकांनी गाड्या डेपोमध्ये जमा केल्यात. रात्री ८ वाजतानंतर कुठली बस सोडण्यात येणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दिवसभरात २५ ते ३० टक्केच बस फेऱ्या सुरू राहणार आहेत. परतवाडा व अमरावती मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धनेनुसार बस सोडण्यात येणार आहे.
...............


सायंकाळनंतर रस्त्यांवरील गर्दी ओसरली
शहरात संचारबंदीच्या नियमांची दिवसभर पालन झाले नसले तरी सायंकाळनंतर पोलिसांनी विनाकारण भटकणाऱ्यांना विचारणा सुरू केल्यानंतर रस्त्यावरील गर्दी ओसरणे सुरू झाले होते. रात्री पोलिसांकडून संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याची भिती नागरिकांमध्ये दिसून आली.
..............


कापड बाजारात व्यवहार सुरू
शहरातील काही मोठे कापड व्यावसायिक वगळात इतरांनी संचारबंदी झुगारून गुरुवारी दिवसभर व्यवहार केलेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील कापड विक्रीची दुकाने सुरू होती. गांधी मार्गावर हातगीडीवर कापड विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी दिवसभर गाड्या लावून व्यवहार केलेत.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT