police  sakal
अकोला

Cyber Fraud : सायबर भामट्यांकडून पोलिस असुरक्षित !

फेसबूक हॅकरकडून थेट पोलिस निरीक्षकांचेच फेक अकाऊंट; पैस उकळण्या प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

अकोला - सोशल मीडियावरील भामटे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फेसबूक अकाऊंट हॅक करून त्याद्वारे फेक अकाऊंट तयार करीत पैसा उकळण्याचा प्रयत्न करतात.या भामट्यांना शोधून काढण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे सोशल मीडियावरील अकाऊंटही आता सुरक्षित राहिले नाही. एक भामट्याने थेट अकोल्यातील एका पोलिस निरीक्षकाचेच फेक फेसबूक अकाऊंट बनविले आहे.

अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून आणि त्यांचा खाकी वर्दीतील फोटो डीपीवर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. फेक अकाऊंट बनविणारा व्यक्ती अनोळखी असून, तो सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचे भासवित आहे.

त्याने, अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, याप्रकरणात ठाणेदार धनंजय सायरे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ज्या व्यक्तीने त्यांचे फेसबुकवर फेक अकाऊंट बनविले आहे, तो 'सीआरपीएफ'मध्ये असल्याचे भासवून गंडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांनी केले आहे.

जवळच्या व्यक्तींशी साधतोय संपर्क

पोलिस निरीक्षक सायरे यांचा एकेकाळी सहकारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी या सायबर भामट्याने संपर्क साधून अडचणीत असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या एका बँकेच्या खात्या क्रमांकावर रक्कम टाकण्यास सांगितली. मात्र, शंका आल्याने पोलिस कर्मचाऱ्याने थेट पोलिस निरीक्षक सायरे यांच्याशी संपर्क साधला व या संबंधात माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार समोर आला.

मोबाई क्रमांक मागून करतो संपर्क

फेक फेसबूक अकाऊंट तयार करणारा भामटा संपर्क करण्यासाठी संबंधितांना मोबाइल क्रमांक मागतो. मोबाइल क्रमांक दिल्यास संपर्क साधून तो गंडा घालण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत त्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT