akola sakal
अकोला

अतिपावसामुळे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

खामगाव तालुक्‍यातील परिस्‍थिती ; उडीद पिकाचे सर्वाधिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : गत आठवड्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात १ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद व मका पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या २ हजार १५० आहे. तर आतापर्यंत तालुक्यात ६२२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

या वर्षी सुरुवातीला पिकांसाठी पोषक पाऊस पडला परंतु, गत आठवड्यात झालेल्‍या अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका उडीद, मूग या पिकाला बसला आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीनचा सर्वात जास्त पेरा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला बरसल्याने पिके जोमदार झाली होती. परंतु, सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढला. त्यातच ७ व ८ सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील भालेगाव, सावरगाव, ढोरपगाव, कुंबेफळ, निपाणा, हिवरा खुर्द, पिंपळगाव राजा या भागातील २ हजार १५० शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, उडीद व मका पिकांचे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे १ हजार ३९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने नुकसानीचे सर्व्हेक्षण केले आहे. खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अचानक आलेल्या संकटामुळे खरीप उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानीचा तातडीने सर्वे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

खरीप हंगामातील काही पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी. काही अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

- गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Municipal Election : निवडणूक प्रक्रियेवर नाराजी! चक्क उमेदवार मतदारांना सांगतोय, 'मला मतदान करू नका'; असं का करताहेत घोडके?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Kolhapur Politics : गावोगावचे रस्ते-पाणी-शाळांचे खरे प्रश्न गायब; जिल्हा परिषद निवडणुकीत ‘राज्य-देश पातळीचा प्रचार’च का ठरतोय केंद्रस्थानी?

Overthinking: ओव्हरथिंकिंगचा कंटाळा आला? जपानी लोकांच्या ‘या’ खास पद्धती नक्की वापरून बघा!

AI Video Apps : AI ने बनवलेले व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT