Deepak Tirke criticize bjp political party politics risod market committee election sakal
अकोला

Deepak Tirke : मित्रपक्षांना सावत्रपणाची वागणूक; दीपक तिरकेंचा भाजपवर हल्लाबाेल

रासप जिल्हाध्यक्ष दीपक तिरके यांचा भाजपवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : भारतीय जनता पक्ष सबका साथ सबका विकास हे ब्रीद सातत्याने उच्चारत असते. परंतू प्रत्यक्षात मात्र मित्रपक्षांना जाणीवपूर्वक डावलून सर्वच स्तरावर मित्र पक्षांना बगल देत सापत्न वागणूक दिली जात असल्याची भावना राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) जिल्हाध्यक्ष दीपक तिरके यांनी व्यक्त करित तीव्र शब्दात भाजपचा निषेध केला.

सध्या जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. समविचारी पक्षांची युती करून बाजार समितीवर विजयाची पताका लावण्यासाठी भाजपाची तयारी सुरु आहे. मात्र रासपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही चर्चेत वा नियोजनात सहभागी करून घेतले नाही.

रासप त्यामुळे आपण यांच्या मित्र पक्षाचा घटक आहे किंवा नाही असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करित आहेत. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत रासप जिल्हाध्यक्ष दीपक तिरके यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनाही कोणत्याही भाजपाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून साधी विचारपूस सुद्धा केली गेली नाही.

ही बाब अतिशय गंभीर असून योग्य मान सन्मान न मिळाल्यास जिल्ह्यात रासपला आपली भूमिका बदलावी लागेल असा इशारा तिरके यांनी दिला आहे. भाजपाला केवळ रासपची मते पहिजेत मात्र सत्तेत वाटा द्यायची वेळ आली तर बोटचेपी धोरण अवलंबिले जाते हा दुजाभाव भविष्यात सहन केला जाणार नसल्याचा इशारा तिरके यांनी दिला असून भाजपकडून मित्र पक्षाबरोबर होत असलेला दुजाभाव वरिष्ठापर्यंत कळविणार असल्याचे तिरके यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT