demand for vegetables in Pitrupaksha 10 to 20 percent price hike of fruits and vegetables sakal
अकोला

Pitru Paksha : पितृपक्ष पंधरवड्यामध्ये भाज्यांची वाढली मागणी; भाजीपाल्यासह फळांच्याही किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ

सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली असून, त्यामुळे भाज्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भाजी मार्केट मधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदुरा : सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली असून, त्यामुळे भाज्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भाजी मार्केट मधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पितृपंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, चवळीच्या शेंगा, मुळा, आले, काकडीसह विविध प्रकारच्या पालेभाज्यांना दरवर्षी मोठी मागणी असते. या भाज्यांची मागणी वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही.

उलट मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक न झाल्यास आणखी दर वाढू शकतात. सद्यस्थितीत वाढलेल्या मागणीमुळेच घाऊक आणि किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याचेही भाजी व्यापारी नमूद करत आहेत.

बाजारात भाजीपाला विभागात पितृपंधरवड्यानिमित्त लागणाऱ्या भाज्यांची आवक नांदुरा तालुक्यात होत आहे. पावसाची सध्या उघडझाप सुरू आहे. विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांचा दर्जाही सध्या चांगला आहे. त्यामुळेही चांगला दर मिळत आहे.

पेरू, केळी, डाळिंबालाही मागणी

पितृपंधरवड्यात जशी विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते तशीच काही फळांनाही मागणी राहते. पेरू, केळी आणि डाळिंबाला मागणी वाढल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात या तीनही फळांच्या दरात वाढ झाली आहे.

पेरू आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा भाव १०० ते ३०० रुपये, केळी ४० ते ६० रुपये डझन, तर पेरूचा किलोचा भाव दर्जानुसार २० ते ५० रुपये चालू आहे. किरकोळ बाजारातील भाज्यांचे किलोचे दर- गवार -१२० रुपये किलो, भेंडी - ८० रुपये किलो, कारली - ८० रुपये किलो,चवळी- ८० रुपये किलो, काकडी- ८० रुपये किलो असे दर बाजारात दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT