Dengue  sakal
अकोला

अकोला : डेंगीचा प्रभाव कमी; वर्षभरात एकही मृत्यू नाही

अकोला मनपा क्षेत्रात उपाययोजना; किटक सर्वेक्षणावर भर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूमुळे गेले तीन वर्षांपासून त्रस्त केले आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात डेंगी व इतर किटकजण्य आजारांचा समावेश आहे. असे असले तरी अकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे वर्षभरात एकही मृत्यू डेंगीने झाला नाही. डेंगीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यात किटक सर्व्‍हेक्षणावर भर दिला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इतर आजारांचे प्रमाण जास्त होतांना दिसत आहे. गेले दोन वर्षात डेंगी आजाराच्या रुग्णामध्ये कमालीची घट झाल्याचे दिसत आहे. वर्ष भरात डेंगीने एकही रुग्ण दगावलेला नाही, ही दिसालासादक बाब आहे.

डेंगी तापाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मलेरिया विभागाच्या वतीने सर्वतोपरी पयत्‍न करण्यात येत आहे. डेंगी जोखीम ग्रस्त भागाची विविध पद्धतीने तपासणी करून त्या भागात किटकशास्त्रीय सर्व्‍हेक्षणा अंतर्गत ताप सर्व्‍हेक्षण, कंटेनर सर्व्‍हेक्षण केले जात आहे. त्यात डास अळीनाशकाचा उपयोग करून डासांची घनता कमी करणे, कोरडा दिवस पाडणे, फवारणी, धुरळणी करणे व संडासाच्या व्हेंटपाईपला नायलोन डास रोधक जाळीदार टोपी लावणे किंवा पातळ कापड बांधणे आधी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केले आहेत.

‘डेंगी प्रतिबंध, हिवताप झिरो’

यावर्षी डेंडगी तापाचा प्रसार रोखण्यासाठी ता. १६ मे २०२२ रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त ‘डेगी प्रतिबंधाकरिता आपल्या घरापासून सुरुवात, हिवतापाला झिरो करू, माझ्या पासून सुरुवात करू’ हे ब्रीद वाक्य आहे. डेंगीचा प्रसार हा एडीस इजिप्टॉय नावाच्या डासांच्या मादी मार्फत पसरविल्या जातो. या डासाची उत्‍पत्‍ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. डासांचा प्रादुर्भावामुळे हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक जीव घेणे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.

सेप्टिक टँँक सर्वाधिक घातक

वैज्ञानिक अभ्यासाअंती असे आढळून आले की डासांची ३० ते ४० टक्के उत्‍पत्‍ती ही सेप्टीक टँकमध्ये होते. संडासाच्या व्हेंटपाईपला नायलॉन जाळीदार टोपी किंवा पातळ कापड बांधल्यास डासांच्या वाढत्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हिवताप, डेंगी, चिकुन गुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक जीव घेणे आजार मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून नागरीकांनी त्यांच्या संडासाच्या व्‍हेंटपाईपला नायलॉन जाळीदार टोपी, कॅप लावणे किंवा पातळ कापड बांधणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT