diarrhea control fortnight will implemented in akola health sakal
अकोला

Akola News : जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविणार; जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक संपन्न

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यासह जिल्ह्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अर्भक व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून ५ ते ७ टक्के बालक अतिसारामुळे दगावतात आणि या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यासह जिल्ह्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन अंमलबजवणीसाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

अतिसार नियंत्रण पंधरवाड्यात सार्वजनिक आरोग्य विभाग बरोबरच महिला बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कार्य करण्याबाबत सूचित करण्यात आले.

अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे असे आवाहन सीईओ बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, आरएमओ डॉ. भावना हाडोळे, माता व बालपण संगोपन अधिकारी डॉ. विनोद करांजेकर यांनी केले.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आरएमओ डॉ. भावना हाडोळे, डॉ. रोकडे, शिक्षणाधिकारी कार्यालयाचे राठोड, महिला व बाल विकास विभागाचे सुमेध चक्रणारायण, नीमाचे अध्यक्ष, आरोग्य विभागाचे अविनाश बेलोकर, पीएचएन मीनाक्षी फुकट, दुर्गा चोपडे, नंदा किरडे, सचिन उनवणे, विजय घुगे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ओआरएस कॉर्नर तयार करण्याच्या सूचना

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी अतिसारावर उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र येथे ओआरएस कॉर्नर तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की मोहिमेदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवड्यात पाच वर्षाखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओआरएस पाकीट वापरण्याबाबत महत्व सांगतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT