bearers of Congress sakal
अकोला

Akola News : काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी; बंदुकीने उडविण्याची धमकी दिल्याचा आरोप

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये माध्यमांसमोरच हमरीतुमरी झाली.

मनोज भिवगडे

अकोला - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये माध्यमांसमोरच हमरीतुमरी झाली. यातून एकाने दुसऱ्याला बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला. विशेष म्हणजे, ही घटना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोरच घडली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी पीक विम्याच्या प्रश्नावर काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलाविली होती. शासकीय विश्रामगगृहात आयोजित ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर एकत्रित छायाचित्र काढत असताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील आणि प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्यात उभे राहण्याच्या शुल्क कारणावरून वादा झाला.

त्यातून दोघेही हमरीतुमरीवर आलेत. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही या प्रसंगी उपस्थित होते. डॉ. अभय पाटील हे सभागृहातून धावत बाहेर आले आणि ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले. त्यावेळी त्यांनी गाडीत ठेवलेली पिस्टल काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. काही माध्यम प्रतिनिधी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.

डॉ. अभय पाटील यांच्या मागेच मदन भरगड हेसुद्धा बाहेर आलेत व त्यांनी आत घडलेल्या प्रकार माध्यमांपुढे कथन केला. डॉ. पाटील यांनी बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही यावेळी भरगड यांनी माध्यमांशी बोलताना केला.

वरिष्ठ नेत्यांपुढेच दोन नेते भिडले

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी व माजी राज्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबतच एकत्र छायाचित्र काढण्यासाठी सर्व पदाधिकारी उभे असताना हा वाद घडून आला. दोन्ही नेते आपसात भांडत असल्याना वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

बैठकीतील वाद उफाळून आल्याची चर्चा

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मदन भरगड यांनी उमेदवारीवरून काही टिप्पणी केल्याची माहिती आहे. माध्यमांशी बोलताना भरगड यांनी या विषयाचा उल्लेखही केला. पॅराशूट लावून पक्षात आलेल्या नेत्‍यांना उमेदवारी कशी देणार,असा प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला होता. त्यावरून हा वाद झाल्याचा दावा भरगड यांनी केला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून प्रतिक्रिया देण्यास नकार

काँग्रेसने दिलेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन नेत्यांमध्ये वाद झाला. नेत्यांच्या पुढेच हा वाद झाला असतानाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी माध्यमांसोबत बोलताना काय घडले याबाबत माहिती नसल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल पाठविणार?

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर प्रदेश कार्यकारिणील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये माध्यमांपुढेच वाद झाला. या वादसंदर्भात जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT