Distribution of foodgrains in ration shops across Buldana district has come to a standstill due to non-upload of data in e-pass machine 
अकोला

धान्य उपलब्ध असूनही वाटप रखडले; ई पॉस मशीन नॉटरिचेबल

शाहीद कुरेशी

मोताळा (बुलडाणा) : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने धान्य वाटप व्हावे, याकरिता रेशन दुकानदारांना ई पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र मार्च महिन्यातील १८ दिवस उलटूनही ई पॉस मशीनमध्ये डेटा अपलोड झाला नसल्याने जिल्हाभरात रेशन दुकानातील धान्य वाटप ठप्प झाले आहे. धान्य उपलब्ध असूनही वाटप रखडल्याने लाभार्थ्यांसह दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे. तसेच गैरप्रकारांना आळा बसावा याकरिता शासनाने रेशन दुकानदारांना ई पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रेशन दुकानदारांच्या ई पॉस मशीनमध्ये डाटा अपलोड होतो. त्यानंतर दुकानातून वाटप सुरू होते. रेशन दुकानातून माल घेणार्‍या लाभार्थ्यांचा अंगठा ई पॉस मशीनवर घेतला जातो.

ऑनलाइन धान्य वाटपाच्या तंत्रामुळे लाभार्थ्यांची संख्या, त्यांना वाटप झालेला धान्य आदीची अचूक माहिती शासनाला मिळते. परंतु डेटा जोपर्यंत अपलोड होत नाही. तोपर्यंत धान्याचे वाटप करणे शक्य होत नाही. जिल्ह्यासह मोताळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मार्च महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे. परंतु ई पॉस मशीनवर डेटा अपलोड झालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानात धान्य असूनही वाटप रखडले आहे. वन नेशन वन कार्ड मोहीमअंतर्गत डाटा अपलोडचे काम सुरू असल्याने सर्वच ई पॉस मशीनच नॉटरिचेबल असल्याचे समजते. 

मार्च महिन्यातील जवळपास तीन आठवडे उलटत आले असून, अद्याप समस्या कायम आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही काळ रेशन धान्याचे ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्यात आले होते. संसर्ग कमी झाल्यावर पुन्हा ई पॉस मशीनवर थम्ब घेऊन ऑनलाइन पद्धतीने धान्य वाटप सुरू झाले. धान्य वाटप सुरळीत सुरू असताना, मार्च महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे ई पॉस मशीन बंद आहेत. होळीचा सण तोंडावर आला असून, गोरगरीब लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. गावागावात लाभार्थी धान्य दुकानावर चकरा मारून हैराण झाले आहेत. त्यांची समजूत घालताना रेशन दुकानदारांची दमछाक होत आहे. काही ठिकाणी लाभार्थी व रेशन दुकानदारांमध्ये खटके उडत आहेत. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. 

मार्च महिन्याचे धान्य उपलब्ध होऊन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र ई पॉस मशीनवर डाटा अपलोड झालेला नाही. त्यामुळे धान्याचे वाटप रखडले आहे. वन नेशन वन कार्ड मोहीम अंतर्गत डाटा अपलोडचे काम सुरू असल्याने सर्वत्र ई पॉस मशीन नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र धान्य वाटप रखडल्याने लाभार्थी व दुकानदार अडचणीत आले आहेत. 
-विश्वासराव पाटील, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, मोताळा 

होळीचा सण तोंडावर आला असून अद्यापही रेशन दुकानातून धान्याचे वाटप सुरू झाले नाही. गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणार्‍या धान्यामुळे आधार मिळतो. परंतु तांत्रिक बाबींमुळे ई पॉस मशीन बंद असल्याचे सांगितले जाते. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्याची गरज आहे. 
- मो. अकील रजा, लाभार्थी, मोताळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT