cow sakal
अकोला

अकोला : जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले ३९ गोवंशांना जीवदान

पहाटेच्या सुमारास कारवाई; कत्तलखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पोलिसांच्या कारवाईला न जुमानता शहरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलीची दखल घेत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी गुरुवारी पहाटे मोहमंद अली परिसरातील कत्तल खाण्यावर छापा टाकला. यात पाच लाखांवर मास्क व ३९ जिवंत गोवंश आढळून आले. या कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांसोबत रामदासपेठ पोलिस व महानगरपालिकेचे पथकही सहभागी झाले होते.

शहरातील मोहमंद अली रोड स्थती मच्छी मार्टेक येथे मासोळी बाजार भरत असला तरी आतील बाजूस सर्रास गोवंश तस्करी करून आणलेल्या गोवंशाची कत्तल करण्यात येते. पोलिसांनी वारंवार कारवाई केली तरी छुप्या मार्गाने हे तस्कर आपले काम सुरूच ठेवत असतल्याची माहिती अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांना मिळाली. याच महितीच्या आधारावर पहाटे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ताफ्यासह मोहोम्मद अली रोड स्थित मच्छी मार्केटमध्ये पोहोचून येथील कत्तल खान्यावर छापा टाकला असता येथे गोवंश कत्तली सुरू असल्याचे निदर्शनात आले. रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी ताफ्यासह आसपासचा परिसर पिंजून काढला असताना पाच लाख ६० हजाराचे २४ जिवंत बैल व १५ गाई आढळून आल्यात. सर्व गोवंशाना आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प यांच्याकडे सोपविण्यात आले.

या ठिकाणी ठेवण्यात आलेले मास देखील जप्त करण्यात आले. पहाटेच्या सुमारास अचानक झालेल्या या कारवाई मुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने आरसीपी प्ल्याटून व रामदास पेठ पोलिसांनी मोर्चा सांभाळून परिस्थिती नियंत्रणात आणली. कारवाईत जिल्हाधिकारी नीमा अरोरा, रामदास पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शखाली कारवाई केल्याने गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT