Radhakrishna Vikhe Patil Sakal
अकोला

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री पाटील आज जिल्हा दौऱ्यावर,विविध विषयांचा घेणार आढावा

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, जिथे विविध सरकारी योजनांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवारी (ता. २२) तब्बल सहा महिन्यांनंतर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. याआधी पालकमंत्री विखे पाटील फेब्रुवारी महिन्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांचे २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या निर्धारीत दौरा कार्यक्रमानुसार त्यांचे २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता शिर्डी विमानतळ जिल्हा अहमदनगर येथून विमानाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन होईल. यावेळी ते विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित तीन दिवशीय शिवार फेरी व पीक प्रात्यक्षिक तसेच चर्चा सत्राच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

दुपारी १ वाजता माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी १.१५ वाजता बेघर निवारा व घन कचरा व्यवस्थापन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृहात त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी नुकसान, पिक विमा, पिक कर्ज, ज्वारी खरेदी संदर्भात आढावा घेतील. दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, बळीराजा वीज सवलत योजना, मुलींना मोफत व उच्च शिक्षण योजा व महानग आरोग्य मेळावा व आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील.

दुपारी ५ ते ३.६० वाजेपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय आढावा, जि.प. शाळा, पाणंद रस्ते याबाबत आढावा घेतील. २२ सप्टेंबर रोजी रात्रभर मुक्काम केल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. पालकमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमामुळे शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून विविध शासकीय कार्यालयात शनिवारी (ता. २१) वर्दळ दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT