document filing error online service center owner and citizen Suffering Sakal
अकोला

Akola : एरर...माहिती एकाची आणि पावती दुसऱ्याची; सेवा केंद्र संचालक त्रस्त, नागरिकांची भटकंती

Akola Latest News In Marathi | दिवसभर येणारा एरर...रात्री येणार नाही या आशेने केंद्र चालक नागरिकांना आणखी त्रास होऊ नये यासाठी अर्ज भरण्यासाठी रात्री बे रात्री जागून काम करीत आहे.

सिद्धार्थ वाहुरवाघ

Akola News : सध्या शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्न, जातीचा दाखला, प्रतिज्ञापत्र यासह इतर शासकीय दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, नागरिक आपले सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. परंतु, हे दाखले काढताना केंद्र चालकांच्या नाकी नऊ येत आहेत. अर्जदाराची पूर्ण माहिती भरल्यावर माहिती एकाची आणि पावती दुसऱ्याच्या नावाने निघत असल्याने आपले सेवा केंद्र संचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

दिवसभर येणारा एरर...रात्री येणार नाही या आशेने केंद्र चालक नागरिकांना आणखी त्रास होऊ नये यासाठी अर्ज भरण्यासाठी रात्री बे रात्री जागून काम करीत आहे. परंतु, सर्व प्रक्रिया केल्यानंतर दिवसभर सतावणारा एरर येत असल्याने केंद्र संचालकांची दिवसासारखी रात्रही खराब होत आहे.

महायाटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोड होत असल्यामुळे अशी समस्या निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, ही समस्या फक्त अकोला तालुक्यातील आपले सेवा केंद्र संचालकांनाच सतावत असल्याचेही उघकीस आले.

अकोला जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र सर्व कामे सुरळीत चालू असल्याचे केंद्र चालकांकडून बोलल्या जात आहे. याबाबत वरिष्ठांकडूनही काही उपाययोजना केल्या जात नसल्याने अकोला तालुक्यातील केंद्र संचालक त्रस्त झाले आहेत.

ही समस्या सतावत असतानाच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज भरून घेणाऱ्या महिलांची गर्दी होत आहे. ऑनलाइन भरण्यासाठी देण्यात आलेले ‘नारीशक्ती दूत’ ॲप एक मिनिट सुरळीत चालते आणि दिवसभर काहीच काम होत नसल्याने महिलांचे ऑफलाइन घेतलेले अर्ज ऑनलाइन करण्यासाठी रात्री बे रात्री जागून काहीच हाती येत नाही.

एखादा अर्ज यशस्वी झाला तर खूप मोठी मेहनत केल्याचे केंद्र संचालकांना वाटते. परंतु, तेवढ्या रात्री महिलांना ओटीपी घेण्यासाठी फोन कसा करावा, असा मोठा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आपले सेवा केंद्रावर आणि ‘नारीशक्ती दूत’ ॲप येणाऱ्या समस्यांचे लवकर सोडविण्याची मागणी अकोला जिल्ह्यातील आपले सेवा केंद्र संचालकांकडून केल्या जात आहे.

एक दिवस पाडले होते बंद

आपले सेवा केंद्राच्या पोर्टलवर काम करताना ता. १ जुलैपासून अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी व इतर मागण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र संघटनेच्या वतीने ता. ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एकदिवसीय बंद पुकारला होता. निवेदन देऊन आज आठ दिवस उलटले आहेत. परंतु, त्यावर काहीच तोडगा निघाला नसल्याने केंद्र संचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अकोला तालुक्यातील अर्जांची संख्या जास्त असल्याने उत्त्पन्न प्रमाणपत्रकरिता सर्वरवरील अडचण निर्माण झाली आहे. पुढील दोन-तीन दिवसात सर्वरवरील अडचण दूर करण्यात येणार असल्याबाबत महाआयटी कार्यालयाने कळविले आहे. तोपर्यंत कॉमन फोर्म या सेवेद्वारा नागरिकांचे फोर्म भरणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

- विशाल धोटे, जिल्हा व्यवस्थापक, महायाटी, अकोला.

गत आठ-दहा दिवसांपासून फक्त अकोला तालुक्यातील सेतू केंद्राच्या सेवा विस्कळीत झाल्या असून, शहर व ग्रामीण लोकसंख्येचा भार बघता त्वरीत महाआयटीकडून तांत्रीक अडचण दूर होण अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नसल्याने नुकसान होत आहे.

- मनिष तिवारी, जिल्हाध्यक्ष, महा-ई-सेवा केद्र संघटना, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT