भारतीय कृषी अनुसंधान परिषद sakal
अकोला

‘डॉ. पंदेकृवि’ ची राष्ट्रीय पातळीवर २६ व्या स्थानी भरारी

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पातळीवर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सन २०२० मधील भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पातळीवरील मानांकनात देशभरातील ७२ कृषी विद्यापीठापैकी ६७ विद्यापीठांनी सहभाग नोंदवीला होता. अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कार्याचा आलेख दरवर्षी उंचावत ४८ व्या (२०१८) स्थानापासून ३८ (२०१९ ) आणि यंदा २६ व्या (२०२०) स्थानावर मजल मारली आहे.भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत देशभरातील सर्वच कृषी विद्यापीठे कार्यरत असून, विद्यापीठांचा शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कामांचा वार्षिक आढावा दरवर्षी परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येतो. विद्यापीठांमधील उपलब्ध सोयी सुविधा, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गांची शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरी तथा विद्यापीठाचा कृषी तथा तत्सम विभागामार्फत कृषी विस्तार कार्यक्रमाचा लेखाजोखा या निमित्ताने दरवर्षी तपासला जातो.

राष्ट्रीय पातळीवर बहुतेक संस्था केवळ शिक्षण अथवा संशोधन कार्यात सहभागी असून, महाराष्ट्रातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी शिक्षण, कृषी संशोधन यासह कृषी विस्तार या तीनही बाजुंवर एकाच वेळी कार्यरत असून, उपलब्ध मनुष्यबळ व संसाधने यांचा सुरेख ताळमेळ साधत आहे. विद्यापीठाच्या तत्कालीन संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक राजीव कटारे, यांचेसह त्यांचे संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या प्रयत्नातून आणि विद्यापीठ नोडल अधिकारी डॉ. शशांक भराड, विद्यापीठ रँकिंक संदर्भात गठीत विशेष समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रभावी नियोजनातून विद्यापीठातील सर्वच विभागांनी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच फळ म्हणून विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर २६ व्या स्थानी झेप घेणे शक्य झाल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी याप्रसंगी केले आहे.

विद्यापीठ स्तरीय संचालक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, कामगार, विद्यार्थी वर्गासह सर्वांचे अभिनंदन तथा ऋण व्यक्त करतांना भविष्यात देखील हाच एकोपा आणि त्यागाची भावना जोपासत शेतीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शेतकरी बंधू-भगिनींसाठी सर्वोत्तम देण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा, असा आशावाद देखील याप्रसंगी कुलगुरूंनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT