Agitation Commissioner Office sakal
अकोला

Drainage Water : नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात; आयुक्तांच्या दालनासमोर नागरिकांचा ठिय्या

गेल्या वर्षभरापासून कॅनॉल रस्त्याला लागून असलेल्या नाल्याचे काम रखडले असून, पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - गेल्या वर्षभरापासून कॅनॉल रस्त्याला लागून असलेल्या नाल्याचे काम रखडले असून, पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. कामासाठी निधी उपलब्ध आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, मग घोडे अडले कोठे, असा सवाल करत परिसरातील नागरिक व प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील शुक्रवारी (ता.१९) महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते.

मात्र, आयुक्तांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने प्रहारचे कार्यकर्ते व नागरिकांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला. त्यानंतर येत्या तीन दिवसांत नाल्याचे काम सुरू होईल, असे आश्र्वासन महानगरपालिकेच्या उपायुक्त यांनी दिले.

कॅनॉल रस्त्याचे काम गत दोन दशकापासून रखडलेले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूंनी आता वस्ती झाली आहे. कॅनॉल रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षापासून या भागात राहणाऱ्या नागरिकांची आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू असताना नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी अनेकवेळा आंदोलने केली. रस्त्याच्या काँक्रीटीकरण न करता खडीकरणाचे काम करण्यात आले.

खडीकरणाचा ठेका मिळालेल्या कंत्राटदारालाच रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याचे काम मिळाले आहे. पावसाळ्यात कॅनॉल रस्त्यावरील नाल्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याचा मोठा त्रास परिसरातील नागरिकांना आहे. या नाल्याचे सुमारे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे.

मात्र, गेल्या वर्षभरापासून नाल्याचे काम अर्धवट आहे. रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील परिसरातील नागरिकांसह आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. आयुक्तांनी कोणतीही चर्चा न केल्याने नागरिकांनी महापालिकेत ठिय्या दिला.

आयुक्तांचे दालन बंद

महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी चर्चा करण्यासाठी परिसरातील नागरिक महानगरपालिकेत आले होते. मात्र, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दालन आतून लावल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या दिला.

अडथळा निर्माण करणारे कोण?

कॅनॉल रस्त्याच्या आजूबाजूला दोन मोठ्या नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या कॅनॉलच्या बऱ्याच भागाजवळ नाल्याचे बांधकाम सुरू आहे. परंतू, देशमुख मंगल कार्यालय ते डाबकी रोड मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या नाल्याचे काम रखडलेले आहे. नाल्याचे काम न झाल्यामुळे पावसाचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरते. नाल्याचे कामांमध्ये अडथळा कोण निर्माण करत आहे, असाही सवाल विचारण्यात येत आहे.

महापालिकेत चिखल टाकण्याचा इशारा

नाल्यांचे काम त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे मनोज पाटील व परिसरातील नागरिकांनी उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांत काम सुरू होईल, असे आश्र्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले. काम सुरू न झाल्यास महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी व चिखल आणून टाकण्याचा इशारा यावेळी प्रहारचे महानगराध्यक्ष पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT