Farmer Adharlink.jpg 
अकोला

‘पोर्टल’ने केला घात...आधार प्रमाणीकरण न झाल्याने पीक कर्जाची अडली वाट

अनुप ताले

अकोला : आधार प्रमाणीकरण करणारे ‘ऑनलाइन पोर्टल’ बंद पडल्याने, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 25 हजार 605 शतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही. कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नसल्याने, बँकांनी या शेतकऱ्यांना थकबाकीदार ठरविले असून, खरिपात पीक कर्ज देण्यासाठी सुद्धा अपात्र ठरविले आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला कमी भाव या नुकसानीच्या जात्यात अडकलेल्या शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार 630 शेतकरी पात्र ठरले. त्यांच्या पात्रता याद्यासुद्धा जाहीर झाल्या. परंतु, कर्जमुक्तीच्या प्रत्यक्ष लाभासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाचे सर्व पोर्टल बंद पडल्याने, जिल्ह्यातील 25 हजार 605 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही आणि त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासूनसुद्धा वंचित राहावे लागले. यापेक्षा चिंतेची बाब म्हणजे, या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम थकीत असल्याने, बँकांनीसुद्धा त्यांना थकबाकीदार ठरवून नव्याने पीक कर्ज देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे केवळ आधार प्रमाणीकरण होऊ शकले नसल्याने, जिल्ह्यातील हे हजारो शेतकरी निराधार झाले असून, खरीप पेरायचा कसा, याची चिंता त्यांना लागली आहे.

आधार प्रमाणीकरण आवश्यक
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार 630 शेतकरी पात्र ठरले. त्यांचेपैकी एक लाख 366 शेतकऱ्यांची जाहीर पात्रता यादीत समावेश असून, आधारप्रमाणीकरण झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार होता. परंतु, पोर्टल बंद पडल्याने, 25 हजार 605 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नसून, बँकांनी त्यांना थकबाकीदार दर्शविले आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकरी 1,09,630
जाहीर पात्रता यादीत समावेश असलेले शेतकरी 1,00,366
आधार प्रमाणीकरण झालेले शेतकरी 74,619
आधार प्रमाणीकरण न झालेले शेतकरी 25,605

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT