अकोला

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबवा!

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाची दुसरी लाट second wave of corona ही ग्रामीण भागात अधिक वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्हाधिकारी पापळकर यांनी दूरस्थ पद्धतीने गुरुवारी (ता. ५) ग्राम प्रशासनाशी संवाद साधला. Effective implementation of preventive measures in rural areas!

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे जिल्हा मुख्यालयातून तर अकोला, अकोट, मूर्तिजापूर या तालुक्यांचे तहसीलदार तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठी हे आपापल्या ग्रामपंचायतीतून सहभागी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अधिक संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाने लागू केल्या आहेत. या उपाययोजनांचे पालन काटेकोरपणे व्हावे, याकडे ग्रामपातळीवरील व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी जादा लक्ष द्यावे, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.

लवकर चाचणी; लगेच उपचाराचे निर्देश

मास्कचा वापर, परस्पर अंतर राखणे, विवाहासारख्या आयोजनांमध्ये २५ पेक्षा अधिक लोकांचाच सहभाग या सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लवकर चाचणी व लगेच रुग्णालयात उपचार या पद्धतीचा अवलंब करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

लसीकरण नोंदणी पंधरवाडा राबवा

गावात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लसीकरण नोंदणी पंधरवाडा राबवावा. त्यामुळे लोकांची नोंदणी होऊन लसीकरण राबविणे सोपे होईल. या शिवाय गावात चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. या निर्बंधांच्या काळात जनतेला अन्न धान्य उपलब्धतेसाठी शासनाकडून होत असलेले मोफत धान्य वितरण हे अधिकाधिक गरजूंपर्यंत कसे पोहोचेल याकडे स्थानिक कर्मचाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सहभागी ग्राम पातळीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT