5.jpg 
अकोला

कोरोनाच्या महामारीगतही 94 जण पाहू शकतील पुन्हा नव्याने जग!

भगवान वानखेडे

अकोला  ः जग किती सुंदर आहे असे आपण नेहमी म्हणतो. पण ज्यांना जन्मतःच किंवा ज्यांचे काहींना काही कारणांने अंधत्व आलेले आहे अशांना जग कितीही सुंदर असले तरीही काय फायदा. पण अशांनाही हे जग पाहता येऊ शकते नव्याने. त्यासाठी असावी लागते ती फक्त इच्छाशक्ती. हो, तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर हेच अंध लोक पुन्हा नव्याने हे जग पाहू शकतात. अशीच इच्छाशक्ती जिल्ह्यातील 94 जणांनी कृतीत उतरून नेत्रदान केले असून, त्यामुळे आता 94 जण पुन्हा नव्याने जग पाहू शकणार आहेत.

नेत्रदान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करु शकतात. आपल्या मृत्यू पत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.

जिल्ह्यात 94 जणांनी केले नेत्रदान
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या नेत्र विभागात आतापर्यंत 14 जणांसोबत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आतापर्यंत 94 जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे आता नेत्र विभागाकडे 188 आयबॉल गोळा झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात 94 जणांना शस्त्रक्रीया करून त्यांना दृष्टी देण्यात येणार आहे.

सहा ते आठ तासाच्या आत करा नेत्रदान
मृत्यूनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे आहे. नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
-नंदन चौरपगार, नेत्रदान समुपदेशक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तथा सर्वोपचार रुग्णालय, अकोला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT