Even-odd method closed at Akola, complete curfew on Sunday; Six-day transactions until seven in the evening 
अकोला

सम-विषम पद्धत बंद, रविवारी पूर्ण संचारबंदी; सहा दिवस व्यवहार सायंकाळी सातपर्यंत

सुगत खाडे

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये साडेचार महिन्यानंतर मोठी सुट देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन-३ ची नियमावली जाहीर करताना आठवड्यातील सहा दिवस सम-विषम बंद केली असून, रविवारी मात्र पूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.


कोरोनामुळे साडेचार महिने संपूर्ण व्यवहार प्रभावित झाले होते. आता हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये पहिल्या दोन टप्प्यात अकोला जिल्ह्यात फारशी मोकळीक देण्यात आली नव्हती. आता तिसऱ्या अनलॉकमध्ये मात्र व्यावसायिकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे.

१ ऑगस्टपासून अकोला शहरातील सम-विषम पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी दुकाने उघडण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वच व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने उघडून व्यवसाय करता येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अनलॉक तीनची नियमावली जाहीर करताना ही घोषणा केली आहे. मात्र ऑगस्टमधील सर्व चारही रविवारी संपूर्ण संचारबंदी राहाणार आहे. त्यामुळे रविवारच्या बाजारात होणारी गर्दी टाळून कोरोना विषाणूच्या होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

व्यापाऱ्यांची मागणी मान्य
केंद्र व राज्य शासनाने १ ऑगस्टपासून जाहीर केलेल्या नव्या नियमावलीला अनुसरून अकोला जिल्‍ह्यातही व्यवसाय करण्यासाठी सम-विषम पद्धत बंद करण्यात यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटना, वंचित बहुजन आघाडी व विदर्भ चेंबरतर्फे करण्यात आली होती. त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून आठवड्यातील सहा दिवस सम-विषम पद्धत बंद करून संपूर्ण दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

या राहतील सवलती

  • सम व विषम तारखेस सकाळी ९ ते ७ यावेळेत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. यापुढे दोन्ही बाजुची सर्व प्रकारची दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शनिवार (रविवार वगळून) सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विहित अटी व शर्तींनुसार सुरू राहतील.
  •  सर्व प्रकारचे मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स हे खाद्यगृह, रेस्टॉरंट वगळता ५ आॅगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. तथापि अशा मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मध्‍ये रेस्टॉरंट मधील किचन व खाद्यगृहांना घरपोच सेवा देता येईल.

- मद्यविक्री पूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहिल.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT