rain 
अकोला

अकोला : शेतकऱ्यांना दिलासा वाढीव मदतीचे ३९ कोटी ३० लाख मंजूर

एक लाख आठ हजार ३३ शेतकऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अतिवृष्टी व ढगफूटी सदृष्य पावसाने जुलै महिन्यात १ लाख २२ हजार ४५६.८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी ३६ लाख रुपयांची मदत दिली होती. सदर मदतीचे शेतकऱ्यांना वाटप सुद्धा करण्यात आले आहे. दरम्यान दिवाळीपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदत जाहीर केली होती, परंतु सदर मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी ३९ कोटी ३० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गत वर्षी जिल्ह्यात आरंभी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक गावातील पेरण्या उलटल्या होत्या. मात्र त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली होती. मात्र २१ ते २४ जुलै दरम्यान प्रचंड पाऊस झाला हाेता. त्यानंतर ६ ते ९ आणि २० ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हाेते.

या नुकसानाची कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेने संयुक्त पाहणी करून अहवाल तयार केला होता. त्यानुसार शासनाकडे मदत निधीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता शासनाने अतिवृष्टी बाधितांना निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु शेतकऱ्यांना वाढीव मदत जाहीर केल्यानंतर सुद्धा शासनाने वाढीव मदत मंजूर केली नव्हती, परंतु आता याबाबतचा शासनादेश जारी करून महसूल व वन विभागाने शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीचे ३९ कोटी ३० लाख मंजूर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT