अकोला

फेसबुकच्या प्रभावशाली नेत्यांच्या यादीत चार नेत्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील चार नेत्यांच्या फेसबुक पेजला फेसबुक या समाजमाध्यमाने ब्लू टीकची मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. सदर नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर, कॉंग्रेसचे डॉ. सुधीर ढोणे, केंद्रीय राज्यमंत्री ॲड. संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा समावेश आहे. (Facebook's list of influential leaders includes four leaders)

सोशल मिडीयात सर्वाधिक लोकप्रिय व सर्वात जास्त वापर असलेल्या फेसबुक या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठीत समाज माध्यमाने देश-विदेशातील सेलिब्रेटी लोकांचा त्यांच्या फेसबुक पेजवर ‘ब्लू टीक’ची मान्यता देऊन त्यांचा समावेश प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केला आहे. चित्रपट अभिनेते, खेळाडू, राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार, लेखक, गायक, प्रभावशाली राजकीय नेते व अन्य सेलिब्रेटी लोकांनाच फेसबुक ‘ब्लू टीक’ ची मान्यता देते. राजकीय क्षेत्रात विविध पक्षातील महत्वाच्या पदांवर असलेल्या प्रभावशाली नेत्यांना फेसबुकने ‘ब्लू टीक’ व्दारे सेलिब्रेटी ठरविले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे या चार नेत्यांचा फेसबुकने ‘ब्लू टीक’ ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला.

असे आहेत फॉलोअर्स
फेसबुकवर सर्वाधिक १ लाख ९० हजार ५२४ समर्थक (फॉलोअर्स) ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर डॉ. सुधीर ढोणे हे आहेत. डॉ. सुधीर ढोणे यांचे १ लाख १९ हजार २४३ समर्थक (फॉलोअर्स) आहेत. तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे १ लाख १६ हजार ८७८ तर चौथ्या क्रमांकावर माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे १ लाख १५ हजार ४६७ समर्थक (फॉलोअर्स) आहेत.

यामुळे मिळाले ‘ब्लू टीक’
जिल्ह्यातील ज्या चार नेत्यांचा फेसबुकने प्रभावशाली नेत्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामध्ये ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार असून राज्यांत त्यांना बराच मोठा जनाधार आहे. संजय धोत्रे हे सलग चार वेळा लोकसभेत विजयी झाले असून केंद्रात राज्यमंत्री आहेत. डॉ. रणजीत पाटील हे सलग दोन वेळा पदवीधर मतदार संघातून विजयी झाले असून मागील सरकारच्या काळात त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून तब्बल ६ खात्यांचा प्रभार होता. डॉ. सुधीर ढोणे हे काँग्रेस पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते असून माणिकराव ठाकरे, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात या तीन प्रदेश अध्यक्षांच्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता व सध्याही नाना पटोले यांच्या कार्यकाळात कार्यरत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते या नात्याने राज्यांतील काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

संपादन - विवेक मेतकर

Facebook's list of influential leaders includes four leaders

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT