fake whatsapp account collector ajit kumbhar demand money Sakal
अकोला

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा प्रकार ८५६-२०९८३२७४० तसेच ९१-९३३२९३९१२८ या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे. अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ ‘रिपोर्ट’ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले आहे. आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला.

तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ चौकशी, तसेच कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT