family dispute Alcoholic father killed by minor son akola crime police sakal
अकोला

Crime News : अल्पवयीन मुलाकडून मद्यपी बापाचा खून

एका कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन अल्पवयीन मुलाने व्यसनाधीन जन्मात्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याचा कायमचा संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : छत्तीसगढमधिल झाडू तयार करणारे कारागीर अकोला येथे वास्तव्यास आहेत. त्यापैकीच एका कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन अल्पवयीन मुलाने व्यसनाधीन जन्मात्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याचा कायमचा संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेतील मृतकाचे नाव सुनील शिकारी आहे.

अकोला शहरातील गीतानगर भागातील मानव शोरुमच्या बाजूला छत्तिसगढमधिल झाडू तयार करणाऱ्या कारगिरांची तात्पुरती वस्ती आहे. त्यापैकीच एक असलेल्या सुनील शिकारी हा पत्नी व मुलांसोबत राहत होता. तो परिवारासह छत्तीसगडहून अकोल्यात झाडू तयार करून विक्री करण्यासाठी आलो होता.

सोमवारी (ता.१३) रात्री या परिवारात वाद झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारीसुद्धा पुन्हा वाद उफाळून आला. त्यात संतप्त अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून पित्याला ठार केले. पोलिसांनी मारेकरी मुलाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : पुण्यात पोलिस अधिकाऱ्याला अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT