Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Aditya Thackeray Kolhapur Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला. विद्यार्थ्याने देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल केला असून आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा केली.
Aditya Thackeray Shares Student Video

Aditya Thackeray Shares Student Video

esakal

Updated on

Uddhav Thackeray Aditya Thackeray : कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आता थेट मुंबईपर्यंत चर्चा रंगली आहे. फूड अँड ड्रग्स विभागाच्या कथित पेपरफुटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी केलेले आक्रमक भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या भाषणाची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. विशेष म्हणजे, यानंतर विवेकानंद पाटील यांची थेट उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com