Farmers complain soybean seeds of Mahabeez did not grow abdul sattar agriculture officers akola sakal
अकोला

Akola News : महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्‍याची शेतकऱ्यांची तक्रार

शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शेतात महाबीजच्या सोयाबीन (फुलेसंगम वाण) बियाण्याची पेरणी केली. सोबत आंतरपीक तूर सुद्धा पेरले. तुरीचे पीक उगवले मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार तेल्हारा तालुक्यातील कार्ला येथील काही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली असून, नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली आहे.

तेल्हारा तालुक्यातील ग्राम कार्ला येथील शेतकऱ्यांनी २०२३-२४ च्या खरीप हंगामाकरिता पेरणीसाठी महाबीजचे बियाणे फुलेसंगम विकत घेतले आणि २५ व २८ जून रोजी या बियाण्याची त्यांच्या शेतामध्ये ११ एक्कर क्षेत्रावर पेरणी केली.

त्यामध्ये आंतरपीक म्हणून तुरीची पेरणी सुद्धा केली. मात्र, हे सोयाबीन बियाणे सदोष असल्यामुळे त्याची कसलीही उगवण झाली नाही व तुरीचे पूर्णपणे उगवण झालेले आहे.

याबाबत महाबीज अकोला शाखा अकोट कार्यालयाला माहिती दिली असता सदर शेतामध्ये मोक्याची पाहणी महाबीजचे कृषीक्षेत्रक अधिकारी एस.पी. फिरके अकोट व कृषी सहाय्यक मोहड यांना सोबत घेऊन तपासणी केली असता,

संबंधित सोयाबीन बियाणे सदोष असल्याचे निदर्शनास आले व त्यांचा अहवाल त्यांनी दिला आहे. सहरहु बियाणे सदोष असल्यामुळे आर्थिक नुकसान झाले असून, पेरणी वेळ सुद्धा वाया गेल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी निवेदनात नमुद केले आहे.

सदोष बियाण्याबाबतचे विकत घेतल्याचे बिल जोडले असून, सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील ग्राम कार्लाचे शेतकरी पंकज बाजारे, दिपाली बाजारे, अतुल बाजारे, प्रकाश बाजारे, प्रदीप बाजारे यांनी तेल्हारा कृषी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT