market yard.jpg
market yard.jpg 
अकोला

कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना हे शुल्क आकारू नये; अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शेतकऱ्यांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्रावर तसेच जिनिंग फॅक्‍टरीवर कापसाच्या काट्यासाठी (वजन काटा), कापसाची गाडी खाली करण्‍याचे शुल्‍क इत्यादी कोणत्‍याही प्रकारचे शुल्‍क आकारण्‍यात येवू नये, असे निर्देश जिल्‍हा उपनिबंधक (सहकारी संस्‍था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले आहेत.

हमीदराने शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेबाबत भारतीय कापूस महामंडळ व महाराष्ट्र कापूस महासंघ यांच्या प्रतिनिधीची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्‍या अनुषंगाने लागू असलेल्‍या संचारबंदीच्‍या मर्यादा बघता जिल्ह्यात हमी दराने शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करून सर्व पात्र शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्‍यासाठी व खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्‍यासाठी बैठकीत सूचना देण्‍यात आल्‍या. जिल्ह्यात सर्व तालुक्‍यातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितींमध्‍ये नोंदणी केलेल्‍या शेतकऱ्यांचा कापूस भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) व महाराष्‍ट्र कापूस महासंघ (महा कोट) मार्फत खरेदी करून त्‍यावर २० जिनिंग फॅक्‍टरी मार्फत प्रक्रिया केली जात आहे.

हे निर्देश देण्यात आले
यावेळी निर्देश देण्यात आले की, शेतकऱ्यांच्‍या कापसाचे ग्रेडिंग दरम्‍यान किंवा काटा करताना कापसाचा दर्जा खराब असल्‍याचे सांगून कापसाच्‍या वजनात कट्टी किंवा घट्टी आकारण्‍यात येवू नये. या सूचनांचे उल्‍लंघन होणार नाही याची जबाबदारी संबंधित तालुक्‍याच्‍या कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे सचिव व संबंधित भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) किंवा महाराष्‍ट्र कापूस महासंघ (महा कोट) यांचे केंद्र प्रमुख यांची आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला

प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी समितीचे गठन
हमी दराने शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत ठेवण्‍यासाठी पणन संचालक यांनी प्रत्‍येक तालुक्‍यात तालुकास्‍तरीय तीन सदस्‍यीय कापूस खरेदी समितीचे गठन केले असून, संबंधित तालुक्‍याचे सहाय्यक निबंधक हे अध्‍यक्ष तर, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे सचिव हे सदस्‍य सचिव आहेत. याबाबत तक्रारी असल्‍यास शेतकरी बांधवांनी रीतसर तक्रार संबंधित तालुक्‍याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था यांचे कार्यालयाकडे द्यावी, असे जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT