

Lalbaugcha Raja Donation
ESakal
मुंबई : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून मुंबईत प्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून लोक येत आहेत. सर्वसामान्यांसह दिग्गज कलाकार, राजकारणी आणि बडे उद्योगपती देखील राजाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दिवस-रात्र लालबाग परळ परिसरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे.