river sakal
अकोला

Balapur News : बापानेच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना ढकलले नदीत; पोलिस प्रशासनाची उडाली तारांबळ

नऊ व सात वर्षाच्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना नदीच्या पाण्यात ढकलून देण्याच्या घटनेने खळबळ उडाली असून सदर घटना बाळापूर पोलीसांच्या हद्दीत घडली.

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर - नऊ व सात वर्षाच्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना नदीच्या पाण्यात ढकलून देण्याच्या घटनेने खळबळ उडाली असून सदर घटना बाळापूर पोलीसांच्या हद्दीत घडली असल्याची कथीत माहीती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली असून या मुलींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलीसांनी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील दोन अल्पवयीन मुली २४ तासांपासून बेपत्ता आहेत. कदमापूर येथील शेख हरून शेख शब्बीर या व्यक्तीला चार मुली आहेत. त्यापैकी दोन मुली अटाळी येते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तो घेऊन गेला होता. हल्ली शेख हरून हा लाखनवाडा येथे वास्तव्यास आहे.

आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे हारूनने एका अपरिचित व्यक्तीच्या मोटरसायकलवर दोन मुलींना लाखनवाडा येथे जाण्यासाठी बसवून दिले तेव्हापासून त्या मुली गायब आहे. अशी माहिती स्वतः हारूनने हिवरखेड पोलिसांना दिली आहे.

मात्र याबाबत पोलिसांना हारूनवर संशय आल्याने त्याची उलट तपासणी केली असता त्याने बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील नदीत अल्पवयीन मुलींना ढकलून दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यामुळे खळबळ उडाली असून बुलढाणा पोलिस प्रशासनाने बाळापूर हद्दीतील घटनास्थळी धाव घेतली आहे. अकोला व बुलढाणा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान बुलढाणा पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पिंजर येथील पथक दाखल

कु. आलिया, वय ९ वर्षे व कु.सदप, वय ७ वर्षे, दोन्ही रा. लाखनवाडा, असे बेपत्ता मुलींची नावे असून त्यांचा नदीपात्रात शोध घेण्यात येत आहे. काल शुक्रवारी दुपार पासून मुली बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे

पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे महाराज शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

बुलढाणा पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल

बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, डी एस बी पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर, बाळापुर उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, बाळापुर ठाणेदार अनिल जुमळे, बुलढाणा जिल्हा पोलीस दल आणि बाळापुर पोलीस संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक बाळापूर येथील मच्छिंद्रनाथ पथक व गावकरी घटनास्थळावर हजर आहेत.

'अल्पवयीन मुली खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील आहेत. त्यांच्या वडीलाने त्यांना नदीपात्रात ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार बुलढाणा पोलिस प्रशासनाने भिकूंड नदी पुलावर धाव घेतली आहे.

- अनिल जुमळे, ठाणेदार, पोलीस स्टेशन बाळापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT