26THLTPLASMA.jpg 
अकोला

प्लाझ्मा डोनरवर एफडीएचा वाॅच

भगवान वानखेडे

अकोला कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत आहे. यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सतत केले जात आहे. मात्र, प्लाझ्मा डोनेटमध्ये काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष असणार असून, यामध्ये अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

खासगी रक्तपेढ्यांना व्यावसायिक दाता निवडणे किंवा पैसे देऊन दात्याकडून रक्त घेणे अथवा रक्त घेऊन रक्तघटक तयार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर अकोल्यातील खासगी आठ आणि शासकीय एका रक्तपेढीपैकी केवळ सर्वोपचारमधील शासकीय रक्तपेढीलाच रक्तदात्याची आवश्यक ती सर्व कागदपत्रे पडताळून आणि आवश्यक त्या सर्व चाचण्या करून दात्याच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. तर यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध विभागाला अधिकार देण्यात आले असून, अन्न व औषध विभाग या शासकीय रक्तपेढीची कधीही तपासणी करू शकते. यामध्ये काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे.

काळ्या बाजाराची अशी आहे शक्यता
सध्या अकोल्यातील खासगी रक्तपेढ्यांना डोनरकडून प्लाझ्मा देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ही परवानगी केवळ शासकीय रक्तपेढीलाच आहे. मात्र, मोठ्या महानगरातील शासकीय सोबतच खासगी रक्तपेढ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा रक्तपेढ्या डोनरकडून प्लाझ्मा घेऊन त्या बाधितांना जास्त पैशात विकू शकतात. असा प्रकार मोठ्या महानगरात सुरू आहे. या काळाबाजाराची अकोल्यातही भीती असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हे नियम पाळावे लागणारच
पात्र रक्तदात्याकडून रक्त घटक घेतल्यानंतर त्याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या करणे, त्याची नोंद ठेवणे आणि योग्य तापमानामध्ये त्याची साठवणूक करणे बंधनकारक आहे. कोरोना रुग्णाला रक्त घटक देण्यापूर्वी डाॅक्टरांचे मागणीपत्र आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. रुग्णालयांनी रक्त घटकाची मागणी करण्यापूर्वी आलेल्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणे व त्याची चौकशी करावी लागणार आहे.

प्लाझ्मा डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष आहे. कुणीही गैरप्रकाराला बळी पडू नये, डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणाकडूनही प्लाझ्मा घेऊन नये, भूलथापांना बळी पडू नये.
-
हेमंत मेटकर, सहाय्यक आयुक्त, औषधी विभाग, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT