अकोला

तिसऱ्या लाटेची भिती; लहान मुलांना संक्रमणाचा धोका

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये Corona third wave वैज्ञानिकांनी व विश्लेषकांनी दर्शविलेल्या अंदाजानुसार लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे ऑक्सिजन व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्याची मागणी महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी केली आहे. Fear of the third wave; Children at risk of infection

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सदरच्या व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संक्रमण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून सद्यास्थितीत ठोस उपाययोजना करण्याबाबत सरकारला निर्देशित केलेले आहे.

त्यामुळे सरकारी आदेशाची वाट न पाहता शासनाने आपणास दिलेल्या अधिकाराचा वापर करून अकोला जिल्ह्यातील लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी.यात प्रामुख्याने जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांकरीता ऑक्सिजन व्हेंटिलेटरची संख्या तपासून त्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. जेणेकरून तिसऱ्या लाटेच्या संक्रमणातून लहान मुलांचा बचाव करणे शक्य होईल,असे पठाण म्हणाले.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT