Akola
Akola Sakal
अकोला

रब्बी हंगामासाठी महाबीजचे पावणेतीन लाख क्विंटल बियाणे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आगामी काळात सुरू होत असलेल्या रब्बी हंगामासाठी (rabbi season) महाबीजने यंदा गहू, हरभरा, ज्वारी व इतर पिकांच्या बियाण्याची सुमारे पावणे दोन लाख क्विंटलची (quintals) उपलब्धता करून देण्याचे नियोजन केले आहे. हे बियाणे बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यंदा आजवरच्या समाधानकारक पावसामुळे तसेच प्रकल्प भरलेले असल्याने यंदाचा रब्बी हंगाम चांगला राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रब्बीत प्रामुख्याने हऱभऱ्याची लागवड अधिक होत असते. ही बाब लक्षात घेत महाबीजने या हंगामासाठी सुमारे एक लाख ८५ हजार क्विंटल बियाण्याचे नियोजन केले. या प्रामुख्याने जॅकी ९२१८, विजय, दिग्विजय, रामविजय २०२ हे प्रचलित वाण आहेत. गव्हाचे ६७ हजार क्विंटल बियाणे महाबीज देत आहे. यात लोकवन, जीडब्ल्यू ४९६, एमएसीएस ६२२२ हे वाण आहेत. हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तसेच ग्राम बीजोत्पादन योजनाही लागू राहणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळू शकेल, अशी माहिती महाबीज प्रशासनातर्फे देण्यात आली.

यात प्रामुख्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून हरभऱ्याचे दहा वर्षाआतील वाण हे ६१०० रुपये क्विंटल, दहा वर्षावरील वाण ६५०० रुपये दराने मिळतील. तर याच अभियानातून नागपूर, बीड आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात गव्हाचे ३५०० क्विंटल बियाणेही मिळणार आहे. ग्राम बिजोत्पादन योजनेतून जॅकी ९२१८ या वाणाचे सुमारे ८५ हजार क्विंटल बियाणे दिले जाणार आहे.

हे बियाणे ६२०० रुपये क्विंटल असेल. तर गव्हाचे ६७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध राहील. हे बियाणे अवघे १७५० रुपये क्विंटल दराने मिळू शकेल. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाच्या बियाण्याचे प्रतिकिलो १० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. याशिवाय जवस, करडई, लाखलाखोडीचेही रब्बीसाठी काही प्रमाणात बियाणे दिले जात आहे.

ज्वारीचे दुप्पट बियाणे

दैनंदिन आहारात ज्वारीचे महत्त्व वाढत असल्याने मागणी होत आहे. गव्हापेक्षा ज्वारीला अधिक दरही मिळतो. यामुळे शेतकरी आता रब्बीत ज्वारी लागवडीकडे मोठ्या संख्येने वळू लागले. हे लक्षात घेता महाबीज प्रशासनाने रब्बी ज्वारीचे सुमारे २२ हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत हे दुप्पट नियोजन करण्यात आले आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बीची लागवड सुरू होत असते. साधारणपणे महिनाभरात रब्बी लागवडीचा हंगाम जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे महाबीजने बाजारात बियाण्याचा पुरवठा सुरू केलेला आहे. काही प्रमाणात बियाणे उपलब्धही झालेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT