Five thousand farmers are deprived of benefits in Akola Marathi News Zilla Parishad's seed distribution scheme! 
अकोला

जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ४ हजार ९८६ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५ हजार २० लाभार्थ्यांच्याच खात्यात ६३ लाख ९३ हजार ४८२ रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २ कोटी ४ लाख २५ हजार रुपयांच्या योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा सुद्धा समावेश आहे. पावसाळा तोंडावर असतानाच सदर योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया रखडली होती.

परंतु जून महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदानावर देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत योजनेसाठी १ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांची भरिव तरतूद करण्यात आली. त्यामुळे ९ हजार ६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे लक्ष सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने ठेवले होते.

शेतकऱ्यांकडून बिल अप्राप्त
योजनेसाठी काही लाभार्थ्यांनी अद्याप कृषी विभागाकडे बिलच सादर केले नाहीत. त्यामुळे अशा दोन हजार ९५० शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रृटींमुळे पडून आहेत. त्यात अकोला तालुक्यातील ७२९, अकोट ७५५, बाळापूर ४४०, बार्शीटाकळी ६४१, पातूर ३८०, मूर्तिजापूर ३५८, तेल्हारा तालुक्यातील ८८९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

अशी आहे स्थिती
- लाभार्थी लक्षांक - ९ हजार ६
- प्राप्त प्रस्ताव - ५ हजार २०
- पं.स. स्तरावर उपलब्ध - १ हजार ३६
- शेतकऱ्यांकडून बिल अप्राप्त प्रस्ताव - २ हजार ९५०
- लेखा विभागाला सादर प्रस्ताव - ५ हजार २०
- लाभ दिलेले शेतकरी - ५ हजार २०
- लाभाची जमा रक्कम - ६३ लाख ९३ हजार
- लाभापासून वंचित - ५ हजार ८५१ठेव

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT