forest official accept ten thousand bribe for stay out of case of gond seed buldhana Sakal
अकोला

Buldana News : सालई गोंद बी प्रकरणात आरोपी करणार नाही; त्यासाठी 10 हजाराची लाच मागणारा वनपाल अडकला जाळ्यात

वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाचा सालई गोंद अवैध रित्या करण्याबाबतचा गुन्हा दाखल आहे.

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर(बुलढाणा) : वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाचा सालई गोंद अवैध रित्या करण्याबाबतचा गुन्हा दाखल आहे.

त्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी कलीम शेख, वनपाल वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) कार्यालय, जळगाव जामोद यानी १०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या कडे झाली होती.

त्यानुसार दिनांक 6 मे रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही करण्यात आली . त्यात आरोपी कलीम शेख, वनपाल यांनी पंचा समक्ष १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली, दरम्यान तक्रारदार यांचेकडून १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारतांना वनपाल शेख यास रंगेहात पकडण्यात आले आहे.

आरोपी वनपाल शेख विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र, अमरावती , अनिल पवार, अप्पर पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती.

यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, सफौ शाम भांगे, पोहेकॉ प्रविण बैरागी, नापोकॉ विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ रंजीत व्यवहारे व चालक नापोकॉ नितीन शेटे व अर्शद शेख यांनी पार पाडली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँन्टी करप्शन व्यरो बुलढाणा कार्यालय दुरध्वनी कमांक ०७२६२-२४२५४८ व ९६५७०६६४५५ तसेच टोल फि कमांक १०६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक अँन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT