शोककळा: माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन file photo
अकोला

शोककळा: माजी आमदार प्रकाश डहाके यांचे निधन

नागपूर येथे सुरू होते उपचार

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : कारंजा बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश उत्तमराव डहाके (Prakash Dahake) यांचे आज दुपारी 12 वाजेदरम्यान नागपूर येथे निधन झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर अमरावती व नागपूर येथे उपचार सुरू होते. Former MLA Prakash Dahake died

कारंजा विधासभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोना संसर्गातुन ते बरे झाले होते. मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दोन दिवसापुर्वी त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रकाश डहाके हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे 2009 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून ते कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार नेता म्हणून त्यांची ओळख होती.

मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करून कारंजा विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा गड ढासळणार, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT