online fraud news sakal
अकोला

अकोला : बनावट वेबसाइटद्वारे फसवणूक

सरकारी सौरपंपाचे आमिष; ग्राहकांनी सतर्क रहावे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषीपंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अहमदनगर सायबर पोलिसांनी अटक केली असून, वीजग्राहकांनी अशा प्रकारच्या बनावट संकेतस्थळाला प्रतिसाद देऊ नये. सौरकृषी पंप योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने ‘जलसंजीवनी. ईन’ या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असून, त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, योजनेची संपूर्ण माहिती वा लाभ घेण्यासाठी अधिकृत शासकीय संकेतस्थळावर वा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महावितरण नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT