Free grain woman cheating Akola Charges filed against both 
अकोला

अकोला : मोफत धान्याच्या नावावर महिलेची फसवणूक

८० हजारांचे दागिने लुटले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘तुम्हाला मोफत धान्य हवे असेल तर आधी तुमचे दागिने काढून ठेवा, नाहीतर तुम्हाला धान्य मिळणार नाही’, असे सांगून रुग्णालयात निघालेल्या महिलेचे ८० हजाराचे दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

जुने शहरातील अगरवेस परिसरातील ६२ वर्षीय महिला तिच्या नातवासोबत काला चबुतरा येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचा डबा घेऊन जात होती. वृद्धेला बघून पांढऱ्या रंगाचे मास्क लावलेल्या भामट्यांनी गांधी चौक येथे कुल्फीचे दुकानासमोर ‘अम्मा तुमको फ्री का राशन मिला क्या, चलाे सामने मिल रहा है’ असे म्हणून गांधी रोडवरील प्रकाश ज्वेलर्सचे बंद दुकानासमोर नेले.

तेथे आधीच एक जण पायरीवर बसलेला होता. तो म्हणाला की मोफत राशन देणाऱ्याला मी येथे घेऊन येतो. तोपर्यंत तुमचे अंगावरील दागिने काढून थैलीत ठेवा. नाहीतर तुमचे दागिने पाहून तुम्हाला तो मोफत राशन देणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेऊन महिलेने दागिने काढले आणि थैलीमध्ये ठेवत असतानाच थैलीची गाठ बांधतो म्हणून पिशवी जवळ घेतली व गाठ बांधण्याच्या नावाखाली दागिने काढून घेतले.

राशन घेऊन येतो असे म्हणून तेथून पोबारा केला, बराच वेळ झाल्यानंतर दोघेही आले नाही म्हणून थैलीत बघितले असता सोन्याचे दागीने सेवन पिसची १० ग्रॅम पोथ, सोन्याचे कानातील बाली नऊ ग्रॅम असे १९ ग्रम दागिने त्याची किंमत ८५ हजार व नगदी दोन हजार असा मुद्देमाल भामटे घेऊन पसार झाल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT