अकोला

मुख्यमंत्र्यांच्या ‘मोफत’ शिवभोजन थाळीने ठेवले अनेकांना उपाशी!

मोजक्यात थाळीने अनेकांची निराशा; आमदारांनी केली केंद्रांची पाहणी

विवेक मेतकर

अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पंधरा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करताना गरजूंकरिता मोफत शिवभोजन थाळी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अकोला जिल्ह्यात या मोफत थाळीने अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मोजक्यात थाळीचे वाटप केले जात असल्याने वापट सुरू होताच काही वेळात थाळी संपून जात असल्याने थाळीसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत असल्याचे दिसून आले.


कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘ब्रेक-द-चेन’ जाहीर करताना विविध मदतीची घोषणा केली होती. त्यात राज्यातील मजूर, स्थलांतरित मजूर, बेघर, बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी गरजूंचे जेवणा अभावी हाल अपेष्टा होऊ नये म्हणून मोफत शिवभोजन थाळी देण्याच्या घोषणेचाही समावेश होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यात १५ केंद्रांवरून फक्त तीन हजार थालींचे वितरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

अकोला शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती या तीन शिवभोजन केंद्रावरून थाळीचे वितरण करण्याची शासनाची मंजुरी आहे. या शिवभोजन केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली असता अल्प वेळेतच वाटप करण्यात येत असल्याने शिवभोजन थाळ्या संपल्यामुळे अनेकांना उपाशीपोटी परतावे लागल्याची माहिती केंद्रासमोरील लाभ न मिळालेल्या गरजूंनी दिली. त्यामुळे गरजूंची संख्या लक्षात घेता शिवभोजन थाळ्या वाढवून देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.



धान्य वाटपाचा आदेशच नाही!
राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार मोफत धान्य वाटपाबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाला आदेशच प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले. आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तालुका अध्यक्ष अंबादास उमाळे, जयंत मसने आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत प्राधान्य गट, अंत्योदय योजना , एपीएल केशरी शेतकरी यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत वाटपाची घोषणेनंतर प्रत्यक्षात वाटप सुरू झाले का, याची माहिती घेण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांनी आदेशच प्राप्त नसल्याचे सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Schools Closed in India: देशात एक लाख प्राथमिक शाळा बंद; संसदेत गाजला मुद्दा, खरी परिस्थिती नेमकी काय आहे?

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

MHT CET Final Merit List 2026 आज जाहीर! CAP Round 1 Choice Filling सुरू; मेरिट लिस्ट कशी पाहाल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

License Suspended: नगदवाडी-१४ मध्ये संचिता फुड्सवर अन्न व औषध प्रशासनाची धडक; कुल्फी उत्पादन परवाना तात्काळ निलंबित

SCROLL FOR NEXT