Gowardhan Haramkar sakal
अकोला

Akola News : गोवर्धन मृत्यूप्रकरणात पीएसआय जवरे यांचा जामिन मंजूर; फिर्यादी उच्च न्यायालयात घेणार धाव

अकोट पो. स्टे. मध्ये गोवर्धन हरमकार मृत्यूप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पीएसआय राजेश जवरे व पोलिस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - अकोट पो. स्टे. मध्ये गोवर्धन हरमकार मृत्यूप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पीएसआय राजेश जवरे व पोलिस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. न्यायालयाने दोघांचाही जामीन मंजूर केला आहे. तर गोवर्धनच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

सविस्तर असे की, पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अकोट शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय राजेश जवरे यांच्यासह पोलिस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके व काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अकोट पोलिसांत भादवी कलम ३०२, ३४ नूसार विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर राजेश जवरे व चंद्रप्रकाश सोळंके यांना सुरुवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत पिएसआय राजेश जवरे व पोलिस हवालदार चंद्रप्रकाश सोळंके यांची रवानगी झाली होती. याप्रकरणी शनिवारी अकोट न्यायालयात दोन्ही आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली.

न्यायालयाने दोघांचाही जामिन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर गोवर्धनच्या नातेवाईकांनी सिआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली.

तपास सुरुच राहणार

गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणाचा तपास सुरुच राहणार आहे. महत्वाची काही घडामोड याप्रकरणात झाल्यास निश्चित माहिती दिली जाईल.

- अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक, सीआयडी, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT