Gutkha confiscation Old City DB police Squad suspended akola Sakal
अकोला

गुटखा जप्ती: जुने शहर डीबी स्क्वॉड निलंबित!

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलिस ठाण्यातील बीट जमादारासह डीबी स्क्वॉडमधील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जुने शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजाराजवळच्या ट्रकमधून गुटख्याचा माल उतरवित असताना, छापा घालून तब्ब्ल ४० लाखांच्यावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलिस ठाण्यातील बीट जमादारासह डीबी स्क्वॉडमधील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश सोमवारी दिला.

बिझनेस सेंटर येथे एका ट्रकमधून गुटखा आल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली. त्यांच्या पथकाने महामार्गावरील बिझनेस सेंटर येथे छापा घालून ट्रकमधील तब्बल ४० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला होता. तीन-चार आरोपी घटनास्थळाहून वाहने सोडून पसार झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात जुने शहर डीबी स्क्वॉडने कामात कसुरी केल्यामुळे स्क्वॉडमधील सहा जणांना निलंबित केले आहे. यासोबतच जुने शहर ठाणेदारांचासुद्धा कसुरी अहवाल विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिस, विशेष पथकांनी कामात कसूर केल्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एलसीबी प्रमुख, विशेष पथक प्रमुखांचाही कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT