Akola Crime sakal
अकोला

Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या चौहट्टा बाजार येथील ''गुटखा किंग'' नदीम शाह रेहमान शाह याला गुटख्याची तस्करी करताना दहिहांडा पोलिसांनी अखेर गजाआड केले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या चौहट्टा बाजार येथील ''गुटखा किंग'' नदीम शाह रेहमान शाह याला गुटख्याची तस्करी करताना दहिहांडा पोलिसांनी अखेर गजाआड केले. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक श्री डोंगरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी ही कारवाई केली.

सविस्तर माहितीनुसार, दहीहंडा पोलिस स्टेशनचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास गस्त घालताना मिळालेल्या माहितीवरून पोलिस कर्मचारी व पंचाचे मदतीने नाकाबंदी करून धाड टाकली असता नदीम शाह रेहमान शाह यांच्या कब्जातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा/पान, मसाला अवैधरीत्या वाहतूक करताना सापडला. विशेष म्हणजे नदीम शाह रेहमान शाह हा मागील अनेक वर्षापासून चौहट्टा बाजार परिसरात गुटख्याची अवैध विक्री करत होता.

गत तीन वर्षापासून दहीहंडा पोलिसांना चकमा देत पसार होत होता. मात्र आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास टाकळी रस्त्याने हा इसम आपल्या चारचाकी महिंद्रा एक्सयुव्ही पांढऱ्या रंगाची गाडी क्र MH ०२ CP ०६०० ने येत असल्याचे निदर्शनास आले. दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे आणि कर्मचारी आधीच सापळा लावून होते. सदर इसमाने गाडी त्याच्या घरासमोर थांबवताच पोलिसांनी त्याच्या गाडीची झडती घेतली एकूण ७,६४,४३१ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या विरोधात फिर्यादी म्हणुन स्वतः ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत नदीम शाह रेहमान शहा याला गजाआड केले. दाखल अधिकारी विजयसिंह चव्हाण असून याप्रकरणी पुढील तपास पुरुषोत्तम ठाकरे करीत आहेत. या संपूर्ण कारवाईत ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, प्रवीण पेटे, दिंडोकार, गोपाल अघडते, मनीष वाकोडे, रामेश्वर भगत, अनिलभांडे यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT