Hard labor imprisonment for molesting minor girl akola
Hard labor imprisonment for molesting minor girl akola saka
अकोला

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवून नेणे आणि तिचा विनयभंग केले प्रकरणी दोषी ठरवत अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने बुधवारी कपिल गणेश पडघन (रा. जुना आरटीओ रोड) यास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. नेहमीप्रमाणे ता. २० डिसेंबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलगी ही आईला सांगून शाळेत गेली होती. मात्र, ती परत आली नाही. मुलीच्या वडिलांनी खदान पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक सुकेशनी जमधाडे यांनी पीडित मुलीला मुंबईतील माटुंगा परिसरातून आरोपीसोबत ताब्यात घेतले व गुन्ह्याचा तपास केल्यानंतर कपिल पडघनविरुद्ध भांदविचे कलम ३६६ अ, ३६३, ३५४ ड व पोक्सो कायद्याचे कलम ११,१२ वाढवले. आरोपीला त्याचा भाऊ रुपेश रमेश पडघान याने पळून जाण्यासाठी मदत केल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक केली होती. तपासामध्ये निष्पन्न झाले होते की कपिल हा पीडितेशी जवळीक साधून तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी करीत होता व तिच्या मनात शाळेची व घरच्यांची भीती घालत होता. त्यानंतर त्याने तिला पळवून नेले. या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्यासाठी सहा साक्षीदार तपासले.

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने कपिल गणेश पडघान याला कलम ३६६ अ, ३६३ अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच भादंविचे कलम ३५४ ड व पोक्सो कायद्याचे कलम ११,१२ अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी रुपेश रमेश पडघान याला पुराव्या अभावी निर्दोष सोडले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय कान्हेरकर व एलपीसी सोनू आडे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT